पंतप्रधानांनी नागपुरात लुटला ढोल वाजवण्याचा आनंद

नागपूर : ११ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचं आणि मेट्रो प्रकल्प, एम्सच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी नागपुरमध्ये पंतप्रधानांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. PMO India च्या ट्विटर अकाऊंटवरुन ढोल वाजवतानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नागपुरमध्ये पारंपारिक स्वागत’.
या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी ढोल वाद्याच्या पथकातील एका वादकाकडे असलेला ढोल वाजवताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही झळकत आहे. पंतप्रधानांसोबतच पथकातील इतर तरुणही ढोल वाजवताना दिसतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीतून भाषण केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.

Leave a Reply