वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर : ८ डिसेंबर – सावली तालुक्यातील नीलसनी पेठगाव या गावानजीकच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह बुधवारी दुपारी मिळाला. कैलास लक्ष्मण गेंडेकर (४७), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कैलास हे मंगळवारी शेतावर गेले होते. सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. शेताजवळील सावली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक २०१मध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. मृताच्या नातेवाईकांना तातडीची मदत देण्यात आल्याची माहिती आहे. परिसरात दहशतीचे वातावरण असून गस्त वाढविण्यात आली आहे.

Leave a Reply