पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना, बसला काळ फासले

पुणे : ६ डिसेम्बर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं.
हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फोन करून यां घटनेचा निषेध केला. हे होत असताना आता पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यातील स्वरगेट बस स्ठानकावर जावून कर्नाटकच्या गाड्यांना,(बस)ला काळ फासलं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल जात आहे.

Leave a Reply