नायजेरियात मशिदीवर गोळीबार, १२ जणांचा मृत्यू , १९ जणांचे केले अपहरण

नवी दिल्ली : ५ डिसेंबर – नायजेरियाच्या कट्सिना राज्यातील मैगामजी गावातील एक मशिदीवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जमखी झाले आहेत. तसेच हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १९ जणांचे अपहरण केले आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.
वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मैगामजी गावातील एक मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी नागरिक जमले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी मशिदीत प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळाबारात १२ जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहे. यामध्ये मशिदीच्या इमामांचाही समावेश आहे. तसेच हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १९ जणांचे अपहण केले आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोरांच्या तावडीतून सहा जणांना वाचवण्यात यश आहे. उर्वरित नागरिकांनाही वाचवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी गॅम्बो इसाह यांनी दिली आहे.

Leave a Reply