मुंबईत आरपीआय कार्यकर्त्यांना रहिवाशांकडून मारहाण

मुंबई : ४ डिसेंबर – मुंबईच्या कांदिवली पश्चिम काढली गोराई भागात आरपीआय कार्यकर्त्यांना रहिवाशांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे चारकोप परिसरात भीतीचा वातावरण पसरले आहे. दरम्यान रहिवाशांनी मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. काही रहिवाशांच्या विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश मधुकर साळवे, मुंबई हे डिंगेश्वर तलावच्या मुख्यगेटजवळ, चारकोपगाव येथे त्यांच्या काही RPI कार्यकर्त्यांसोबत गेले होते. तेथील निष्कासीत झालेल्या झोपडपट्टीत राहणारे इसम नामे छोटू व इतर 5-6 पुरूष व काही महीला यांनी काही मंडळी जमवून आरपीआय कार्यकर्त्यांना मारहाण केली.
मागच्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील कांदळवन कत्तलीची जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई येथे तक्रारीचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदार महीला निता जैसवार हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ दमदाटी करत बघून घेण्याची धमकी ही देण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली. या विरुद्ध चारकोप पोलीस ठाण्यात 323, 143, 147, 149, 504, 506 नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मारहाण करून आरोपींनी पलायन केले आहे.

Leave a Reply