मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

संबंध

मनुष्याला आपल्या लोकांसोबत राहायला आवडतं.
एकमेकांशी संबंध निर्माण करून जीवन जगणे हीच त्याला आपल्या जीवनाची विशेषता वाटते. जेव्हा कोरोना काळामध्ये home corontine केल्या गेले तेव्हा मोबाइलच्या माध्यमातून संपर्क असला तरी आपल्या आसपास लोकांचा वावर किती आवश्यक आहे हे त्याला आपसूकच समजले. माणूस कितीही सक्षम झाला तरी त्याला दुसऱ्याची मदत त्याला आवश्यक वाटू लागते.
आपल्या शरीराचे कार्य हे सुद्धा अवयवाच्या सहयोगाने चालते. हाताची पाची बोटं जरी वेगळी असली तरी एकमेकांशी ती जोडली आहेत. त्याच प्रमाणे प्रत्येक माणूस वेगळा असला तरी तो एकमेकांशी जोडला गेला आहे. प्रत्येकाला कधी ना कधी एकमेकांची गरज पडतेच म्हणूनच पाच बोटाप्रमाणे सहायोगाची निशाणीने हात दाखवले जातात. रस्त्यांनी चालतांना जरी लोकांना वेळ नसला तरी हात दाखऊन ते एकमेकांना सोबत असल्याची जाणीव करून देतात.
कुटुंबातील लोकांची साथ ही तेवढीच आवश्यक ठरते. कारण कुटुंबात एक जरी हिरमुसला बसला तरी तो दिवस चांगला जात नाही.
ग्रहाचे पण असेच आहे. लग्न जुळवतांना ग्रहमान पाहिले जाते. पत्रिकेत काही दोष असेल तर लग्न जुळत नाही. प्रत्येक ठिकाणी जे जे हवं ते ते बघितले जाते.
त्याचप्रमाणे घर चालवताना एकमेकांची गरज भासते येवढेच नव्हे तर पेपरवाला कचरेवाला ह्यांची सुद्धा माणसाला गरज भासते.
पण आजच्या युगात लोकांची मानसिकता ही वेगळीच दिसून येते. त्याच्या मते मला आज कोणाची गरज नाही. मी एकटाच बरा अस त्याला वाटू लागत. पण हे कितपत योग्य आहे? माणूस हा अहंकारात बोलून जातो की माझं कोणावाचून काही अडत नाही. पण हे योग्य नाही त्याला केव्हा ना केंव्हा कोणाची गरज पडू लागते.

पल्लवी उधोजी

Leave a Reply