थ्रेशर म्हशींमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू

गोंदिया : २ डिसेंबर – गोंदिया जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर धान कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्याचे काम जोमात सुरू आहे. धान मळणी करिता शेतकरी थ्रेसर मशीनचा वापर करीत असून भाड्याच्या रूपाने या मशीनचा उपयोग शेतकरी करीत असतात. मात्र थ्रेशर मशीनवर धानाचे बोझे टाकत असताना अचानक थ्रेशरमध्ये सापडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील देऊटोला शेतशिवारात घडली. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेने सगळ्याचा धक्का बसला आहे. यामुळे देऊटोलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर धान कापणी सुरू आहे. यासाठी कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्याचे काम केले जाते. यामुळे धान मळणी करिता शेतकरी थ्रेसर मशीनचा वापर मोठ्य प्रमाणात केला जातो.
शेतकरी भाड्याच्या रूपाने या मशीनचा उपयोग करत असतात. मात्र थ्रेशर मशीनवर धानाचे बोझे टाकत असताना अचानक थ्रेशरमध्ये सापडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील देऊटोला शेतशिवारात घडली.
मृतक हा मशीनमध्ये धानाचे बोझे टाकत असताना अचानक तो मशीनमध्ये ओढून दबल्या गेल्याने त्याचा अक्षरशः त्याचा शरीराचा चेंदा मेंदा होऊन मशीन मध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव गुड्डू पटले असे असून तो मु. सोनी ता. गोरेगाव येथील रहिवाशी होता. सदर घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply