मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी

नागपूर : १ डिसेंबर – नागपूर मध्यवर्ती कारागृह कैद्यांतील हाणामारी आणि कारागृहात गांजा, ड्रग्स आणि मोबाईलमुळे चर्चेत आले आहे. बुधवारी पुन्हा कारागृह परिसरात न्यायालयातून परत आलेल्या कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. मात्र, ही घटना घडण्यास आरोपी सेलचे पोलीस अधिकारी जबाबदार असून त्यांच्या नियोजनावर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, कुख्यात गुंड पाली टोळी आणि रोशन या दोघांच्या टोळीतील सदस्यांना आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही टोळीतील सदस्यांना न्यायालयात नेले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन्ही टोळ्यांना परत आणण्यात आले. दोन्ही टोळ्यातील सदस्यांना कारागृहाच्या दरवाजाजवळ असलेल्या एकाच खोलीमध्ये ठेवण्यात आले. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मात्र बाहेर गप्पा करीत बसले होते.
यादरम्यान संधी साधून जुन्या वैमनस्यामुळे पाली आणि रोशन यांच्या टोळीतील कैद्यांनी एकमेकांवर हल्ला केला. हाणामारी होत असल्याचे बघून पोलिसांनी धाव घेतली. दोन्ही टोळ्यांना वेगळे केले आणि नंतर कारागृहात डांबले. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

Leave a Reply