पंतप्रधानांच्या हस्ते ११ डिसेंबरला होणार समृद्धी महामार्ग व नागपूर मेट्रो चे लोकार्पण

नागपूर : १ डिसेंबर – नागपूर मेट्रोचं लोकार्पण आणि समृद्धी महामार्गाचंही लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याने 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाचे प्रशासनाकडून 10 ते 15 हजार लोकं बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत असल्याने आता साऱ्या राज्यासह भाजपमधील नेत्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या आहे
मागील काही महिन्यांपासून नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. ते काम आता झाले असून या दोन्ही कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करणार असून त्यासाठी आता पेंडॅाल सज्ज ठेवण्यात आले आहेत.
या पेंडॉलमध्ये किमान दहा ते पंधरा हजार लोकं बसू शकतील एवढ्या भव्य दिव्य आकारात हा पेंडॉल उभा करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावरील वायफळ टोलप्लाझा येथे लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी नागपूरसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.
बांधकाम कंपनीकडून समृद्धी महामार्गाच्या सर्व टोलच्या हस्तांतरण पूर्ण करण्यात आले असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply