१० वर्षीय मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गुच्छा

गोंदिया : 30 नोव्हेंबर – तुम्ही यापूर्वी ऐकला असाल लहान बाळाने पैसे, किंवा छोटीशी एखादी वस्तू, किंवा माती खातो तर कुणी चुना, खडू या गोष्टी तुम्हाला नवीन वाटत नसतील परंतु एका मुलीने चक्क केस खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. तिने 100, 200 नाही तर तब्बल 500 ग्रॅम केस खाल्ल्याचा थक्क करणारा प्रकार गोंदियात समोर आला आहे. डाँक्टरांच्या अथक प्रयत्नाने तब्बल तीन तासाच्या शस्त्रक्रिया करत तिच्या पोटातून अर्धा किलो केस बाहेर डाँक्टरांना यश आले.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील 10 वर्षीय मुलीला तीन दिवसांपासून भुक न लागणे, पोट दुखणे, उलटी होणे हा त्रास होत होता. याकरिता तिच्या वडिलांनी तिला तिरोडा येथील बालरोगतज्ञ यांना दाखविले. त्यांनी त्या मुलीची सोनोग्राफी काढली असता पोटात काहितरी वेगळी वस्तु असल्याचे कळले. यामुळे त्यांनी तिला पुढील उपचाराकरीता गोंदिया येथील खाजगी व्दारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. विभु शर्मा यांच्याकडे पाठविले.
डॉ. शर्मा यांनी तिची तपासणी केली, तिच्या पोटाचे सिटीस्कॅन काढले असता पोटात केसांचा गुच्छा असुन तो आतडयात गुंतलेला असल्याचे लक्षात आले. याबाबत मुलीच्या वडीलांना विचारले असता वडिलांनी सांगितलं की ती लहानपणी केस खायची, असे वडिलांनी सांगितले. परंतु आता तिने केस खाणे बंद केले आहे, असेही सांगितले.
यावर डॉ. शर्मा यांनी त्या मुलीची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते. शस्त्रक्रिया करताना मुलीच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले.
नातेवईकांच्या संमतीने ही शस्त्रक्रिया डॉ. शर्मा आणि डॉ. श्रध्दा शर्मा यांनी एकमेकांच्या मदतीने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून अर्धा किलो केसांचा गुंता मुलीच्या पोटातून काढला. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती बरी असून तिला लवकरच रूग्णालयातून मुक्त करण्यात येणार आहे.

Leave a Reply