आगामी हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना जास्तीत जास्त प्राधान्य देणार – अजित पवार

मुंबई : ३० नोव्हेंबर – नागपूर इथं होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधीपक्षांच्या गटनेत्यांची बुधवारी बैठक पार पडली. यावेळी अधिवेनशनात विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य मिळालं पाहिजे, यावर एकमत झाल्यांचं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
या बैठकली सर्वच गटनेते हजर होते फक्त जयंत पाटील आणि नाना पटोले येऊ शकले नाहीत.
अजित पवार म्हणाले, बैठकीत साधारण अधिवेशनाच्या निमित्तानं कोणते विषय चर्चेला घ्यायचे सर्वांमध्ये एकजूट कशी राहिली पाहिजे यावर चर्चा झाली. आजच कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती पण ती अचानक पुढे ५ तारखेला ढकलली गेली. त्यामुळं अधिवेशन १९ डिसेंबरला सुरु झाल्यानंतर किती काळा करता घ्यायचं याबाबत सरकारच्या मनात काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, अधिवेशनात आम्ही आमची भूमिका मांडूच मांडू, पण एक कार्यक्रम असा छापला गेला आहे की, ज्यात पाच दिवसांचं कामकाज दाखवण्यात आलं आहे. तर पुढच्या आठवड्यात शासकीय-अशासकीय कामकाज दाखवलं गेलं आहे.
पण कामकाज सल्लागार समितीचं याबाबत निर्णय घेईल. यामध्ये विरोधीपक्षाच्यावतीनं विषयांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना सांगू असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
यंदाचं हिवाळी अधिवेशन विदर्भात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही विदर्भात अधिवेशन झालं पण कोविडमुळं ते फार काळ होऊ शकलं नाही. त्यानंतरही पुन्हा तिच परिस्थिती होती. याकाळात विदर्भातील प्रश्नांवर जास्त काम होऊ शकलं नव्हतं त्यामुळं यंदा आमची हीच भूमिका राहणार आहे की विदर्भातील प्रश्नांना जास्तीत जास्त प्राधान्य मिळालं पाहिजे. त्याशिवाय इतर प्रश्नांवर अंतिम आठवडा प्रस्ताव असतो त्यामध्ये इतर प्रश्न घ्यायचं ठरवेलं आहे. यापद्धतीनं बैठकीत सर्व चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

Leave a Reply