अनिल देशमुखांचे पुत्र ऋषीकेश यांना कोर्टाकडून जामीन मंजूर

नागपूर : २८ नोव्हेंबर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष PMLA कोर्टानं हा जामीन मंजूर केला. यामुळं ऋषीकेश यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शंभर कोटी रुपयांच्या कथीत आर्थिक घोटाळ्याप्रकरणी हा जमीन मंजूर झाला आहे. सीआरपीसीच्या कलम ८८ अंतर्गत ऋषीकेश देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं सुनावणीनंतर त्यांना तीन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Leave a Reply