महिला साडी – सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात – बाबा रामदेव

ठाणे : २५ नोव्हेंबर – अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.
महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.
“महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, रचणार आहेत. मी जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हाही एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा पुरुषार्थ आहे त्यांच्यात, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा” असं रामदेव बाबा म्हणाले.
माझ्यात आणि बाळकृष्ण यांच्यात कधी वाद होतो, कधी ते वेगळे होतायेत याकडे अनेक लक्ष लावून आहेत, पण तसं काही होणार नाही असंच राज्यात सुरु असल्याचं मिश्किल भाष्यही रामदेव बाबांनी केलं.

Leave a Reply