अमिताभ बच्चन यांचा व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा

मुंबई : २५ नोव्हेंबर – अभिनेते अमिताभ बच्चन गेली अनेक दशके बॉलिवूडवर राज्य करत आहेत. गेल्या अनेक वर्षात अमिताभ बच्चन यांनी उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपट कोणताही असो, अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांना भुरळ पाडतात. अमिताभ यांच्याविषयी रोज काही ना काही बातमी समोर येत असते. अशातच अमिताभ यांच्याविषयी नवी बातमी समोर आलीये.
बॉलिवूडचे दिग्गज महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. प्रसिद्ध वकील हरीश साळवे न्यायमूर्ती नवीन चावला यांच्यासमोर अमिताभ बच्चन यांची बाजू मांडणार आहेत. एनआयने याविषयी ट्विट करत माहिती दिली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बिग बींनी त्यांची प्रतिमा, व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये, आवाज आणि नाव सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्ली हायकोर्टात आपले नाव, प्रतिमा, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाच्या गुणधर्मांना संरक्षण मिळावे यासाठी दावा दाखल केला आहे. एकल न्यायाधीश नवीन चावला यांनी याचिकेवर सुनावणी केली. अमिताभ बच्चन यांना मोठा दिलासा देत न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम मनाई आदेश दिला आहे. त्यानुसार अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचे चित्र आणि आवाज वापरता येणार नाही.
दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ शो अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. या कार्यक्रमाची धुरा महानायक अमिताभ बच्चन सांभाळताना दिसतात. केबीसीच्या मंचावर बिग बींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अमिताभ बच्चन या वयातही सक्रिय आहेत. आजतागायत ते प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यांच्याविषयी भरपूर आदर आजही दाखवला जातो.

Leave a Reply