माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांचा मिनी ट्रक आणि भाजीचे दुकान पेटविले

नागपूर : २४ नोव्हेंबर – विवाहबाह्य संबंधातून नागपुरात एक वेगळीच घटना घडली आहे. आपल्यासोबत पळून जाण्यास नकार दिल्यानं एका विवाहित प्रियकरानं प्रेयसीच्या वडिलांच्या मालकीचा मिनी ट्रक आणि भाजीचं दुकान पेटवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी आणि महिलेचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. याबद्दल समजताच आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली. प्रेयसीनं आपल्यासोबत वाघोदा गावात यावं, त्यासाठी घर सोडावं यासाठी आरोपीनं तगादा लावला होता. मात्र तिनं पळून येण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकरानं प्रेयसीच्या वडिलांचं दुकान आणि मिनी ट्रक पेटवून दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Leave a Reply