ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात पक्षासंबंधीचे कागदपत्रे सादर

नवी दिल्ली : २२ नोव्हेंबर – राज्यातील राजकारणात अनेक खळबळ माजवणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची याबाबत शर्यत निर्माण झाली होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून खरी शिवसेना आमचीच असं सांगण्यात येत होतं. खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाभोवती राज्यातील राजकारण ढवळून निघालं. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला यासंबधी कागदपत्र सादर केली आहे.
ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे. दरम्यान आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्र आणि 15 लाखांच्या आसपास प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. आजच ठाकरे गट निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर केले आहे.
शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाली, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्हं दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे.
खरी शिवसेना कोणाची हा वाद जिंकण दोन्ही गटासाठी महत्वाचं बनलं आहे. दोन्ही गट शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान ठाकरे गटाने याबाबत सर्व कागदपत्रे आणि इतर माहिती गोळा केली आहे.

Leave a Reply