औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली – भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी

मुंबई : २० नोव्हेंबर – छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता आणखी एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.
“औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली, असं म्हणत सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अपमान केला. त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत बसता. सतत स्वाभिमानाची भाषा बोलणारे शिंदे आता गप्प का? शिवरायांचा अपमान तुम्ही सहन कसा काय करू शकता?, असं राऊत म्हणालेत.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्रिवेदी यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असा बोलणारा भाजप प्रवक्ता ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणालेत.

Leave a Reply