आता घरगुती एलपीजी सिलेंडरला लागणार क्यूआर कोड

नवी दिल्ली : १७ नोव्हेंबर – घरगुती म्हणजेच एलपीजी सिलेंडर बाबत सरकारने एक नवी अपडेट जाहीर केली आहे. आता घरगुती सिलेंडरवर क्युआर कोड असणार. येत्या तीन महिन्यात क्यूआर कोड असलेले घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर देशभरात उपलब्ध होणार.
अनेकदा एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे कुठेच मिळत नाही पण आता या क्युआर कोडच्या मदतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे.
स्मार्टफोनवरुन तुम्ही हा क्युआर कोड स्कॅन करुन तुमच्या प्रश्नांची विस्तृत माहिती जाणून घेणार आहात. हा कोड सिलेंडरच्या आधारकार्डसारखे काम करणार.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की यामुळे घरगुती सिलेंडरला रेगुलेट करण्यास मिळेल. पुरी पुढे म्हणाले की हा एक मोठा बदल असेल. कारण आता ग्राहक एलपीजी सिलेंडरला ट्रॅक करू शकणार.

Leave a Reply