बुलढाण्यात एटीएम मधून निघाला साप!

बुलडाणा : १६ नोव्हेंबर – जिल्ह्यात सध्या नवनवीन आणि विश्वास न बसणाऱ्या घटना घडत आहे. दोन दिवसांपूर्वी चक्क एसटी महामंडळाची बस चोरट्याने पळवून नेली. पण बिघाड झाल्यामुळे एसटी बस रस्त्यावर सोडून तो पळून गेला. तर आता बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेला युवकाला साप दिसल्याने एकच गोंधळ उडाला.
आपण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर आणि एटीएमची प्रक्रिया केल्यानंतर त्यातून फक्त पैसे येतील, असा विचार करतो. पण पैसे येण्याऐवजी सापच आल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील एका स्टेट बँक शाखेतील एटीएममध्ये हा प्रकार घडला. काही तरुण मंडळी या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना एटीएममध्ये चक्क नागराज विराजमान झाल्याचे दिसले. पण प्रसंगावधान राखत त्या युवकांनी सर्पमित्रांना बोलावले. आणि नंतर सापाला पुन्हा जंगलामध्ये सोडून देण्यात आले.
पण एटीएममध्ये कोणी वृद्ध व्यक्ती किंवा प्रसंगावधान न ठेवता त्यांनी हा प्रसंग हाताळला असता तर तो जीवावर सुद्धा बेतू शकला असता. यामुळे अशी घटना समोर आल्यानंतर जनजागृतीच्या दृष्टीने का होईना, आपण सावध राहणे आवश्यक आहे. कारण कामासाठी पैसे लागत असल्याने आपण एटीएममध्ये पैसे काढण्याच्या गडबडीत असतो. यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
एसटी महामंडळाची बस चोरल्याची घटना बुलडण्यात नुकतीच समोर आली. या घटनेत चोरट्याने रात्रीच्या वेळेस डेपोमधून एसटी बस चोरण्याचा प्रयत्न केला. पण बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला ती तिथेच सोडून द्यावी लागली. तर या न त्या कारणाने मागील दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्हा वेगवगेळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे.

Leave a Reply