धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणीचा तलावात बुडून मृत्यू

औरंगाबाद : १५ नोव्हेंबर – कन्नड तालुक्यातील नागद भिलदरी शिवारातील पाझर तलावामध्ये बाल दिना दिवशी दोन सख्या बहिणीचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. काजल पवार, मीनाक्षी पवार असे या मुलींची नावे आहेत. दरम्यान काजल आणि मीनाक्षी या तलावामध्ये धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. बहीणींना नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नागद प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सख्या बहिणींना तपासून मृत घोषित केले. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागद- सायगव्हाण परिसरातील आसलेल्या भिलदरीच्या पाझर तलावात दोन अल्पवयीन कामगार बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काजल परशुराम पवार (वय 15), मीनाक्षी परशुराम पवार (वय 13, रा. होळणांथा ता. शिरपूर जि. धुळे) ह्या दोघी बहिणी सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारास भिलदरी हद्दीतील छोट्या पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. पाण्यात पाय घसरून पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सदरील मुली ह्या भिलदरी येथील गोरक झिपा पवार यांच्या वीटभट्टीवर आपल्या पालकांसह मजुरी करण्यासाठी आलेल्या होत्या. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा बदलून आलेल्या सर्व सामान्य कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply