भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार – मुख्यमंत्र्यांची घोषणा

भंडारा : १२ नोव्हेंबर – भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्यात केली. जलपर्यटनामुळं भंडारा येथील लोकांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री दिवसभर भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पाण्याचं प्रदूषण होणार नाही. जलपर्णीदेखील जाईल. हे सगळं करत असताना पाणी कुठही प्रदूषित होणार नाही. याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खासदार, आमदार व अधिकारी आहेत. मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे.
सरकारनं निर्णय घेतला की, तुमची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. चांगले निर्णय घेतले. ते लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. राज्याच्या दृष्टीकोणातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांशी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते संवाद साधत होते.
तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे भाष्य केलंय. महाविकास आघाडीला हा अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. आमचं सरकार उद्योगांना चालना देणार असल्याचंदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलंय. नागपुरात विमानतळावर उतरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
क्लस्टर प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिंदे म्हणाले, कुठलाही प्रकल्प तीन महिन्यात येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का. ही काही जादूची कांडी नसते की, फिरवलं नि इकडं आला नि तिकडं गेला. आरोप करायचं तर कुणीही आरोप करू शकतो. आमचं सरकार उद्योगांचा चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणार सरकार आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply