महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 आमदार आमच्या संपर्कात – उदय सामंत

रत्नागिरी : ६ नोव्हेंबर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. तर, महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, असा गौप्यस्फोटच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी धक्कादायक दावाही केला.
मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही, उलट महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे, असा दावाच सामंत यांनी केला.
महाविकास आघडीत काय आलबेल ते आज पुढे आले आहे. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का? असा उलट सवालच सामंत यांनी विचारला आहे.

Leave a Reply