घरी सोडून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

गोंदिया : ६ नोव्हेंबर – गोंदिया शहरातील पाल चौक येथून घरी सोडून देण्याच्या नावाने एका 31 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला घरी सोडून देतो म्हणून आपल्या दुचाकीवर बसवून नेले. तर तरुणाने स्वतःच्या घरी आवश्यक काम असल्याच्या सांगत आपल्या घरी घेऊन गेला. व घरी कुणीही नसल्याच्या फायदा घेत तीच्यावर अत्याचार केला. आणि कुणास काही सांगायचे नाही अशी धमकी दिली.
मात्र मुलीने झालेला प्रसंग आपल्या घरी आईला सांगितला, आईने तात्काळ गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपी राजु डे (वय 31) असुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी विरुद्ध कलम ३७६/२, ३४२ पॉस्को ४/१२/८ गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असून दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत गोंदियात संताप व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply