सर्व कार्यक्रम रद्द करून एकनाथ शिंदे पोहोचले शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : ५ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करुन शरद पवारांच्या भेटीला रुग्णालयात दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचे आज ठाणे आणि मुंबईत काही कार्यक्रम होते. मात्र, ते सर्व रद्द करुन पवारांच्या भेटीला रुग्णालयात पोहचले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल. शरद पवार यांच्यावर गेल्या तीन दिवसापासून उपचार सुरू आहे. उद्या शरद पवार शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला संबोधन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार आहे. पक्षाचं शिबिर संपल्यानंतर पुन्हा हॉस्पिटल मध्ये भरती होणार आहे
शरद पवार यांच्या हेल्थ अपडेटविषयी सांगताना राजेश टोपे म्हणाले, की “दिवाळीत किमान 50 हजार लोकांना शरद पवार भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवलं, न्युमोनिआ किरकोळ विषय आहे,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला. “न्युमोनिआ बद्दल रोजच्या रोज तपासणी केली जाते. त्यानुसार डॉक्टर सल्ला देत राहतात. शरद पवार यांना आराम करण्याची गरज आहे. परंतु, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला ते उपस्थित राहतील. त्यानंतर थोडा आराम करतील. परत आपल्या नियमीत कामाला लागतील, अशी आशा आहे. मला शरद पवारांनी कारखाना सुरु केला का? मोळी टाकली का?,” असेही विचारल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे अभ्यास शिबीर शिर्डी येथे सुरू झाले आहे. याचा शुभारंभ आजपासून सुरू झाला. प्रकृती ठीक नसल्याने पवार या शिबीराला प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नाही. मात्र, व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Leave a Reply