मुंबईतील फॅशन स्ट्रीटमध्ये एका दुकानाला आग

मुंबई : ५ नोव्हेंबर – मुंबईत पुन्हा एकदा आगीची दुर्घटना घडली आहे. आझाद मैदानाला लागून असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये एका दुकानाला आग लागली आहे. या आगीमध्ये दुकान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी न झाल्यााचे वृत्त आहे.
मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये आगीची घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास एका दुकानाला आग लागली.
बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केले. त्यामुळे शेजारी असलेल्या इतर दुकानांनाही आग लागली. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. आता नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात एक मोठी दुर्घटना घडली. यात अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला.
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेत आगीने अनेक कारखान्यांना भक्षस्थानी घेतलं आहे. यात लाखोंचे नुकसान झालं आहे. घटनेची काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये आगीचे लोट पाहायला मिळतात. यावरुनच घटनेची भीषणता लक्षात येते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही

Leave a Reply