बारामतीत पावसाचा धुमाकूळ; बारामती-पुणे रस्ता वाहतूकीसाठी बंद

पुणे : १८ ऑक्टोबर – बारामतीत गेल्या काही दिवसांपासून पावसाने सातत्याने हजेरी लावत चांगलीच तारांबळ उडली आहे. दिवसभराच्या विश्रांतीनंतर पावसाने रात्री ७-८ च्या दरम्यान जोरदार हजेरी लावत नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अनेकजण पाणी साचल्याने रस्त्यावरच अडकून पडल्याचे पाहायला मिळाले.
काही ठिकाणी रस्त्यांवर कंबरे एवढे पाणी साचल्ये होते. या पावसामुळे ५० पेक्षा जास्त लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यापैकी ३५ कुटुबांच स्थलांतर केलं आहे. त्या पाण्यात सगळा संसार भिजला आहे. प्रशासना कडून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर शेतामध्ये पाण्याचे ढव साचले आहे.
शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. तर काल झालेल्या पावसामुळं कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव बारामती-पुणे रस्ता वाहतूकीसाठी बंद केला आहे. अशी माहिती प्रशासना कडून देण्यात आली आहे. तर बारामतीत अनेक ठिकाणी झाड पडीच्या घटना घटल्या आहे. मात्र कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Leave a Reply