पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांकडून अनेक धक्कादायक खुलासे

नाशिक : १८ ऑक्टोबर – राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने विविध शहरांतून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यात चक्क अनेकांना फायरिंगचे प्रशिक्षण देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पी एफ आय संघटनेने मॉडेल २०४७ आखणी केल्याचे एटीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याशिवाय राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा डाव पीएफआय संघटनेचा होता. संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मज्जिद उभारण्याचा डाव आखला गेल्याची माहिती समोर आली आहे. देश विघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉपुलर फ्रंट इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या न्यायालयात संशयित आरोपींना हजर केले असता सुनावणीनंतर ही माहिती देण्यात आली आहे.
22 सप्टेंबर 2022 ला राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि सक्त वसुली संचालनालयाच्या ईडी आदेशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी ही छापेमारी केली होती.
नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान यांना अटक केली होती.
तर बीड मधून वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख, कोल्हापूर मधून मौला नसीसाब मुल्ला या पाच पीएफआयच्या सदस्यांना अटक केली होती.

Leave a Reply