मुंबई महापालिकेने स्वीकारला ऋतुजा लटके यांचा राजीनामा

मुंबई : १४ ऑक्टोबर – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मशाल हे चिन्ह आपल्यासाठी नवीन आहे. छगन भुजबळ 1985 साली या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मशाल हे चिन्ह आपल्यासाठी शुभ आहे, असे देखील लटके म्हणल्या.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने, मा. उच्च न्यायालयातील मा. न्यायमूर्ती नितीन जामदार तसेच मा. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दि. 13.10.2022 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, आपल्या उपरोक्त विषयासंदर्भातील 3.10.2022 रोजीच्या अर्जाबाबत कळविण्यात येते की, आपला बृहन्मुंबई महापालिकेचा राजीनामा 13.10.2022 (कार्यालयीन वेळेनंतर) पासून स्वीकृत करण्यात येत आहे.

Leave a Reply