नाशिकच्या १४ वर्षीय मुलीने एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून मिळवली डॉक्टरेट पदवी

नाशिक : १२ ऑक्टोंबर – नाशिकच्या कन्येने एक नवा विक्रम केला आहे. अवघ्या 14 व्या वर्षी गीत पटनी या मुलीने दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून डॉक्टरेट पदवी मिळविली आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोलंबिया आणि घाणा या दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट एकदाच मिळवणारी गीत देशातील कमी वयात हा बहुमान मिळविणारी ती देशातील पहिली मुलगी असल्याचा दावा गीतचे वडील पराग पटणी यांनी केला आहे. कारण एकाच वेळी दोन डॉक्टरेट इतक्या कमी वयात कोणालाही मिळालेल्या नाहीत.
गीत नाशिक शहरातील नामांकित निर्मला कॉन्व्हेन्ट शाळेत इयत्ता नववी मध्ये शिकते. तिला लहानपणापासून योगाची खूप आवड आहे. कारण वडील पराग पटणी आणि आई काजल पटणी दोघ ही पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांचा साहजिकच फिटनेसवर जास्त भर असतो आणि त्यातूनच गीतला आवड निर्माण झाली. मात्र गीत इतक्या कमी वयात योगाचे क्लास देखील घेते.
हे क्लास कोरोना काळात घेत असताना. तिच्या अस लक्षात आले की सद्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत. त्यामुळे मुल मोबाईल आणि इतर गॅझेटसचा अधिक वापर करत आहेत आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर मानसिकतेवर देखील परिणाम होत आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी गीतने ‘ कोरोना काळात लहान मुलांकडून मोबाईलसह इतर गॅझेटचा वापर आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम व योग अभ्यासातून त्यावर उपाय’ विषयावर प्रबंध तयार करून जगभरातील सात नामांकित विद्यापीठांना सादर केला होता आणि त्यातून कोलंबिया आणि घाणा या दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी गीतला डॉक्टरेट दिली आहे.
गीतने आतापर्यंत अनेकाना योगाचे धडे दिले आहेत. आपल शरीर जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर प्रत्येकाने योगा करणे खूप गरजेचे आहे आणि याच योगाच्या आधारावर गीतने डॉक्टरेट मिळवून सर्वांचं लक्ष वेधल आहे. गीतला योगातील सर्व बारकावे माहित आहेत. तिने प्रबंध सादर करताना अतिशय मेहनत घेतली. या काळात तिच्या आई वडिलांनी देखील तिला मदत केली. वाटल नव्हत की मला आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट या वयात मिळेल पण ते शक्य झाले आहे. हे बघून खूप आनंद वाटतोय अशी प्रतिक्रिया गीत पटणी यांनी दिली आहे.
मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कारण इतक्या कमी वयात लेकीने हे यश संपादन केले आहे. ती लहानपणापासून हुशार आहे चालाख आहे. कोणतही काम ती अगदी मन लावून करते. तिने योगामध्ये आतापर्यंत अनेक बक्षीस पुरस्कार मिळवले आहेत. आम्हाला आमच्या लेकीचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया गीतचे वडील पराग पटणी यांनी दिली आहे.

Leave a Reply