सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

हिंदू राष्ट्र

“हिंदू” जगातील अतिशय दुर्दैवी समाज. एक यहुदी देश इस्त्रायल सोडला तर इतर सारे देश एकतर इस्लामिक राष्ट्र नाहीतर ख्रिश्चन राष्ट्र आणि १०० करोड हिंदू जनसंख्या असलेला भारत आणि इंग्रजांचा India हा देश “Secular” ह्या कक्षेत आणून फसविलेला. आमचे हिंदू बांधवच् सेक्युलरपंतीचा उदो उदो करीत हिंदुत्व तत्वांचा पाया खणत हिंदुत्वाशी आपली नाळ ढिली करताहेत. सेक्युलर मंडळी आपला डाव साधताहेत तर सेक्युलर हिंदू आपल्या धर्माचा सखोल अभ्यास न करता, हिंदुत्ववादी तत्वांना न समजता आपल्या धर्माची चिता जाळताहेत.
केवळ ८० लाख जनसंख्येचा “इस्त्रायल” एक यहुदी समाजाचा देश. ह्या देशात जन्म घेणाऱ्या व्यक्तिचा उभा जन्म इतर देशांशी लढण्यात, स्वतः चे, राष्ट्राचे अस्तित्व खर्ची घालण्यात जातो. देशाभिमानाने ओतप्रोत ह्या देशातील मंडळी फक्त देशाचा अभिमान टिकवून देशाला स्तिमित करीत नाहीत तर देशावर केलेल्या प्रत्येक हल्ल्याचा प्रतिशोध घेतात. “रेथ ऑफ गॉड” आठवतोय हा प्रतिशोध!
१९७२ ऑलिंपिक म्युनीच (Munich) जर्मनी. इस्त्रायल संघाचे अकरा खेळाडू एका फ्लॅटमध्ये थांबले होते. पॅलिस्तिनी आतंकवाद्यांनी रात्रीचे वेळी “मास्टर चावी” ने फ्लॅटचा दरवाजा उघडला. दोन ऍथलीट चा खून केला. आणि कोचसमवेत एकूण ९ ऍथलीट चे अपहरण करून पसार झालेत. बदल्यात त्यांनी पॅलेस्टाईन चे २०० आतंकवाद्यांची सुटका मागितली. मात्र जर्मन पोलिस दल परिस्थिती हाताळायला असमर्थ ठरले आणि उर्वरित ११ जण पॅलेस्टाईन षडयंत्रात बळी पडले. इस्राएल चे तत्कालीन प्रधानमंत्री गोल्डा मेयर ह्यांनी “आतंकवादाविरुद्ध युद्ध” पुकारले. एक गुप्त कमिटी बनविली आणि “मोसाद” ने झालेल्या दुर्घटनेचा प्रतिशोध घेण्याची जबाबदारी स्विकारली. आणि “रेथ ऑफ गॉड” ह्या ऑपरेशन चा जन्म झाला. इस्राएल चा सुप्रसिद्ध गुप्तहेर माईक हरारी ह्याने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि जवळपास १२ आतंकवाद्यांना पृथ्वीतलावर जिथे असतील तिथे कंठस्नान घालण्यात आले. ह्यामधील केवळ एक संशयित वाचला. तो आपले जीवन वाचविण्यासाठी आजतागायत भुमिगत आहे. ह्या प्रतिशोधाने इस्त्रायल ने जगभरात संदेश पोहोचविला की आमच्या राष्ट्राकडे वक्र दृष्टीने बघाल तर जग बघायला तुमची दृष्टी (डोळे) कायमचे बंद होतील. ८० लाख लोकसंख्येचा छटाकभर देश जगाशी टक्कर घेतोय, जगाला वाकवतोय आणि उंच मानेनी जगतोय. सौदी अरेबिया देशात मुसलमानांव्यतिरिक्त अन्य धर्मियाला मक्का शहरात प्रवेश वर्जित. पण यहुदी मोसाद ने मक्का शहरात आपली वर्णी लावली आणि येथील ऑलिंपिक तेनिगडित आतंकवाद्याचा सफाया केला. कुठल्या श्रेणीतील हे व्यवस्थापन असावे? जेव्हाने देशप्रेमी देशाखातर ध्येयाने वेडे होतात, अशावेळी अशा तर्हेचे देशाभिमानी अचाट कृत्ये लिलया पार पाडतात. असे म्हणायला भाग पडते. आज ८० लाख लोकसंख्येचा देश, विदर्भाएवढा पिटुकला देश “यहुदी राष्ट्र” म्हणून डौलाने फडकतोय. जगाशी पंगे घेऊन आपले अबाधित अस्तित्व जागवतोय आणि जगाला संदेश देतोय. “एक बार पंगा लेकर देखलो – बदले मे क्या मिलता है!”
हे उदाहरण एवढ्यासाठी दिले की एकजुट ८० लाख आपल्या यहुदी समाजाचा देश बनवू शकतात पण १०० करोड विखुरलेले हिंदू मात्र “भारत so called India” मात्र स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करु शकत नाही. ही आहे एकोप्याची ताकद.
हा लेख लिहीण्याची उर्मी आली ती काल शिवसेनेच्या दोन सभा झाल्यात आणि दोन्ही रटाळ झाल्यात. उद्धव ठाकरेंना भाषण देणे जमते पण त्यांच्या भाषणात राम नव्हता. स्वतः च्या पतीचा खून केल्यावर त्याच्या चितेसह सती जाण्याचा जो सोहळा असतो. तसला विलाप उद्धव ठाकरेंच्या भाषणात बघायला मिळाला. गद्दार, खोके, फडणवीसांचा कायदा, ह्याला सर्व दिलं पण मिंधे नी पाणी पाजलं ! नवीन काहीच नाही. तर जो गेल्या चार महिन्यांपासून विधवा विलाप चाललाय तसलाच विधवा विलाप काल बघायला मिळाला. “सत्ता गेली नी उद्धव शिवसेना विधवा झाली” त्यानंतर लगोलग संजय राऊतांची रवानगी गजाआड झाली. तिकडे अर्णव गोस्वामी ऊद्धव, आदित्य च्या वाईटावर टपलाय. त्याने सुशांत सिंग राजपूत खुन प्रकरण उकरून काढले आहे. आणि आदित्य ठाकरेची रवानगी गजाआड करण्याची तयारी सुरू आहे. नितेश राणे, नारायण राणे तर आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत की दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत खुन प्रकरणात दोन्ही ठिकाणी पेंग्विन ची उपस्थिती होती. आणि तत्कालीन पोलीस यंत्रणेने दबावाखाली ही चलचित्र फीत सार्वजनिक करण्यास नकार दिला. अन्यथा सीसीटीव्ही कंपनीच्या मालकांनी क्लाऊड वरून ही खुनाची चलचित्र फीत काढून तत्कालीन सरकारी यंत्रणेच्या सुपुर्द केली आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर स्वतः चे अस्तित्व टिकविण्यासाठी दयनीय धडपड करणारा उद्धव ठाकरे. तर तिकडे शिंदे साहेबांना भाषण करण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. भाषण उत्तम असले तरी भाषणाची लय, फेक, लकब जमली तर भाषण ऐकावेसे वाटते अन्यथा सुंदर भाषण देखील रटाळ वाटते.
वाचक मित्रांनो! ही आमची हिंदू संस्कृती आहे का? ज्या हिंदुत्ववादी तत्वांना जोडत जोडत, माळेचा एकेक मणी ओवत ओवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांची शिवसेना बनली होती त्यांचा पुत्र आणि नातू स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करतात. तर अशा लोकांकडून, अशा संघटनांकडून हिंदू समाज हिंदुत्ववादी तत्वांची मुल्ये कशी जपणार? कुंपणच् जर शेत खायला उठणार तर हिंदु समाजाचे रक्षण कोण करणार? पालघर ला संतांना मारेकऱ्यांच्या स्वाधीन करणाऱ्या पोलिसांना जर हिंदू शिवसेना जर कायद्याच्या चौकटीत शिक्षा देवू शकत नाही तर हिंदू समाज देशाला “हिंदू राष्ट्र” कोणत्या बळावर घोषित करणार?
आम्ही भलेही १०० करोड असू पण जोपर्यंत हिंदू तत्वांशी तडजोड करून स्वतः चे पोट भरणारे उद्धव सारखे बडवे जिवंत आहेत तोपर्यंत तरी आम्ही स्वतंत्र हिंदू देशाची स्वप्ने बघणे म्हणजे दिवास्वप्नंच् होय.
दुसरे भाषण झाले ते मुख्यमंत्री शिंदे ह्यांचे. मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे नवीन सरकार बनवल्यानंतर त्यावर लागणाऱ्या लांछनांचा त्यांनी समाचार घेतला. खरं म्हणजे काही ही गरज नव्हती. शिंदेंनी जे केले, जे बोलले ते बरोबर बोलले. पण त्यांच्या बोलण्याची ढब, लकब जनतेला खिळवून ठेवू शकत नाही. परिणामी शिंदेंचे भाषण मुद्देसूद असले तरी मधुन मधुन रटाळ जाणवते. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आणि दिघेंचा हिंदुत्ववादी वारसा चालविण्याचा प्रयत्न ह्यातून जाणवतो. परिणामी शिंदे शिवसेना व भाजपा हा एकच् पर्याय हिंदू जनसामान्यांसमोर जे भारताला “हिंदू राष्ट्र” घोषित करण्याची ताकद ठेवतात. अन्यथा भारतात हिंदू राष्ट्र विरोधी तत्वे एकमेकांचा उदो उदो करताना दिसतात.
आता गंमत बघा पीएफआय वर कायद्याने बंदी आणली तर शरद पवारांची कन्या सुप्रिया ताई सुळे ह्यांनी लगेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणा हे वक्तव्य करतात. खरं म्हणजे! ज्या बाईला एक एकरात १० कोटींचे वांगे कसे पिकविले हे सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशविघातक किंवा देशविरोधी कशी? हे त्या सांगू शकणार नाही. कारण जे आडात तेच् पोहोऱ्यात. शरद पवार १९९३ सालच्या बॉंबस्फोट मालिकेनंतर मुंबई आंदणात दावुद ला देणार होते पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे शरद पवारांचा डाव फसला. तसे बघितले तर शरद पवार आणि मंडळींनी हिंदू जनतेचा उपयोग फक्त स्वतः ला मत घेण्यासाठी करून घेतला व सत्तेत आल्यानंतर हिंदू विरोधी कृत्ये करण्यात, जमिनी हडपण्यात ह्यांची हयात गेलेली. जनतेचा पैसा लुटाल, स्वतः चे खिसे जनतेच्या पैशानी भराल तर तोंडाचा चंबू करून लाळेचे फुत्कार उडवत अस्पष्ट बोल निघतील. पण कोणाच्या व्यंगावर लिहीण्यात स्वारस्य नाही तर ५० वर्षात हा माणूस पैशाने एवढा वाढला, सहकार क्षेत्रात हपापला अन् तसलेच हिंदू विरोधी ज्ञान ह्याने पुढल्या पिढीला दिले. आता सुप्रिया ताई लोकांना मिडिया समोर हिंदू संस्कृती चे पाठ पढवतात तर मिडिया मागे १० कोटी चे वांगे उगवतात.
वाचक मित्रांनो! ह्या मनुष्याची राजकारणातील ५० वर्षे फक्त लावालाव्या, माणसे पळवापळवी, सतत सरकारात राहण्यासाठी नैतिक मुल्यांचा बळी, पैसे लाटणे अशा कृत्यात गेली. अशा वयस्क नेत्याला मराठा असून हिंदू समजला नाही, हिंदुत्व समजले नाही, मुसलमान धार्जिणा पक्ष, हिंदू धर्माची घृणा करणारा पक्ष. फक्त आपल्या परिवाराचे राजकारणातील प्रस्थ वाढविण्यात स्वारस्य आहे. अशा राजकारण्यांकडून भारत देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी काही करु शकतील असे वाटते काय? नाही नं! मग आम्ही अशा नेत्यांना निवडून का देतो?
काल एक क्लिप व्हायरल झाली, बघितली का? “एका कोंबडी वर एक बाटली मोफत” झाले २००-३०० रुपयात मतं पक्क करणारी आमची मतदान करणारी मंडळी. मग आपण कसे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणार? ही व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे. असे नाही का वाटत? ही मंडळी खरंतर गजाआड जगली पाहिजे असे नाही का वाटत? नवाब मलिक सारख्यांना पाठिशी घालून देशाचे वाटोळे करायला निघालेले हे नेतागण, आज ही निवडून येतात ह्याचे वाईट वाटते. मग १०० कोटी हिंदू अशा राजकारण्यांमुळे शकलाशकलांमध्ये विभागला जातो. हिंदू स्त्रोतांची एकजुटता संपुष्टात आली तर १०० करोड हिंदू जनसंख्या असलेला देश ” हिंदू राष्ट्र” कसे बनणार?
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा हिंदुत्ववादी परंपरांना जपणारे एक अजिंक्य युती. पण शरद पवार सांगतात की ही युती तोडून शिवसेनेला फशी पाडायचा त्यांचा जुना मानस. खरे म्हणजे शरद पवार आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दोघेही साधारण १९६६ चे दरम्यान राजकारणात स्थिरावण्यासाठी प्रयत्नशील होते. दोघे ही चांगले मित्र. दोघे ही पैसा कमाविण्यासाठी राजकारणात उतरलेले. होय! मी दोघांबद्दल बरोबर लिहितोय. ह्याला तार्किक कारण आहेत. आणिबाणी मध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेवर गदा यायला नको म्हणून कॉंग्रेस पक्षाची साथ दिली होती तर शरद पवारांबद्दल तार्किक कारण द्यायची गरज नाही. पण दोघाही नेत्यांना मर्यादा होत्या. दोघे ही नेते महाराष्ट्र भर वाढले तरी शरद पवारांनी बृहन्मुंबई ला शिवसेनेच्या हवाली ठेवण्याचे वचन दिले नी मुंबई महापालिका हे शिवसेना चालविण्याचा आर्थिक स्त्रोत बनले. महाराष्ट्रभर वाढणाऱ्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ला शह देणाऱ्या शिवसेनेला मुंबई पर्यंत सिमित ठेवले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्व तत्वांना समजणारे, हिंदुंसाठी राजकारण समजणारे जाणता राजा होते. त्यांना त्यांच्या सिमा आणि भाजपा चा बेलगाम विस्तारणारा अश्व – ह्याचे महत्व माहिती होते. म्हणून कित्येक निर्णय त्यांनी हिंदू संस्कृती जपण्यासाठी, मनाविरुद्ध भाजपा च्या पारड्यात घातलेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भाषण करताना डोळ्यावर काळा गॉगल चढवून भाषण जरी करत असले तरी त्यांच्याकडे संयम आणि दूरदृष्टी होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या हिंदू बांधवांचे हित बघत इतके समोर निघून गेले की शरद पवारांना त्यांचे पंख छापण्यासाठी रणनिती आखावी लागली. भाजपा – शिवसेना युती विभक्त करण्यासाठी मनाविरुद्ध विनाशर्त २०१४ भाजपाला पाठिंबा दिला जेणेकरून शिवसेनेला भाजपा शी युती करताना स्वत्व संपलेले – आणि भाजपाने दिलेल्या जागावाटपावर शिवसेनेला समाधान मानावे लागले.
दरम्यान “पत्राचाल घोटाळा” जोर धरू लागलेला म्हणून संजय राऊत आणि कंपू खिशात राजिनाम्याच्या धमक्या देत असंत. शिवसेनेचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे संजय राऊत. पत्राचाल प्रकरणात जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी हात घातला त्यानंतर संजय राउतांचे धाबे दणाणले आणि केवळ स्वार्थासाठी २०१९ मध्ये त्यांनी भाजपा – शिवसेना युतीचे सरकार अस्तित्वात येवू दिले नाही. पत्राचाल घोटाळ्यात आताशा शरद पवार आणि स्वर्गीय विलासरावांचे नावं मिडियामध्ये येताहेत. म्हणजे संजय राऊत आणि शरद पवार – दोघांचे लागेबांधे घट्ट रूजले. ऊद्धव ठाकरे चा प्रश्नच् नाही. बिनबुडाचा – बिन दूरदृष्टिचा शिवसेना बुडवा बिनडोक नेता. उद्धव ठाकरेचे स्वतः च्या पक्षावर नियंत्रण नाही असा नेता महाराष्ट्र कसा चालविणार? ते सुद्धा दिग्गज पक्षांबरोबर जे पक्ष ५०-५० वर्षे राजकारण कोळून प्यायले आहेत. तिथे हा फोटोग्राफर मुख्यमंत्री बनला. आणि शरद पवारांच्या काट्याला लागला. पण महान नेत्यांच्या पक्ष चालविण्याची जी तत्वे असतात त्या तत्वांना कोणताही पक्षप्रमुख हात लावत नसतो. मात्र ह्याला अपवाद ऊद्धव ठाकरे ठरले. त्यांनी स्वतः च्या वडिलांच्या पक्षाच्या तत्वांना मुठमाती दिली आणि शिवसेना हळूहळू शरद पवार आणि अजित पवार दोघांनी गिळंकृत करण्यास प्रारंभ केला. उद्धव ठाकरेंची मविआ सरकारवरील मुख्यमंत्री ह्या नात्याने पकड निसटल्यानंतर सुप्रिया ताई अचानक मिडिया मध्ये ऍक्टिव्ह झाल्या. त्यानंतर चा कार्यक्रम होता की ऊद्धव ठाकरे ची उचलबांगडी करायची नी सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री बनवायचे. ह्याचे दोन फायदे देशाला एक निरोप जाईल की ऊद्धव माझ्या खिशात आहे आणि अजित पवारांवर वरचढ सुप्रिया ताईंना बसवून अजित पवारांना वेसण घालायची.
मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचे हिंदुत्ववादी विचार, धर्मनिष्ठा, लोकांचा विश्वास आज ही कायम होता. त्यायोगे शरद पवारांच्या राजकिय खेळी लयास गेल्या आणि अचानक शिवसेनेत उठाव झाला आणि रात्रभरात सत्ता गेली. असत्यावर सत्याने मात केली आणि खऱ्या अर्थाने भाजपा – शिवसेना युती सत्तेवर आली. शरद पवारांचे आणि संजय राऊतांचे प्रयत्न अपुरे पडलेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पारडे जड झाले. मविआ सरकार ने केलेली पापे आता त्यांना फेडावी लागणार हे निश्चित. शरद पवारांसारखा नेता देखील स्वतः ची पत वाचवता वाचवता घामाझोकळ झाला आहे. देवेंद्र फडणवीस सारखा मातब्बर मुरलेला राजकारणी पहिल्यांदा त्यांच्या वाटेला आला आहे. शरद पवार नावाची हव्वा त्याने एका फुग्यात भरून तो फुगा लीलया फेकून दिला आहे. ह्या सर्वांचे वर म्हणजे ज्या शिवसेनेला शरद पवार संपवायला निघाले होते ती शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात पुनरुज्जीवित झाली. जी शिवसेना शरद पवारांच्या नियंत्रणात होती ती शिवसेना संपुष्टात आली आणि तिचे सारे कंट्रोल शिंदे भाजपा मध्ये सम सम विलीन झाले.
शरद पवार ह्या वयात आता आपली पत वाचविण्यासाठी फिरणार. षंढ मिडिया त्यांना पाहिजे तशी बातमी देणार. सामान्य जनांत संभ्रम फैलवणार आणि जमल्यास स्वतः ची पोळी शेकून घेणार. राजकारणात फक्त पैसा काहीही करू शकत नाही. तुम्ही विकाऊ लोक घेऊन स्वतः साठी वापरु शकता, हवे तसे फेकून देऊ शकता. पण अराजक आणि अनितीने केलेल्या स्वार्थी राजकारणाला जेव्हा नरेंद्र आणि देवेंद्र सारख्या जोडगोळी चा सामना करावा लागतो त्यावेळी तुमचे धागेदोरे कितीही मजबूत असतील तरीही पाया कच्चा असल्याने टिकाऊ नसतात. म्हणून आज पन्नास वर्षाच्या राजकिय कारकिर्दीले शरद पवार महाराष्ट्रात ५२-५६ सिटांवर निवडून येतात तर काहीही अनुभव नसलेले मोदी, शरद पवारांचे बोट पकडून राजकारण शिकलेले मोदी २० वर्षात भारताला विश्वगुरू स्तरावर नेण्याचे उरात बाळगून गुजरात मधुन देशाचे पंतप्रधान झालेत. देशाची छबी उजळली. भ्रष्टाचाराचा सफाया करायला निघालेले मोदी जेव्हा “न खाऊंगा न खाने दुंगा” म्हणतात तेव्हा शरद पवार मात्र गोळी चालवायला ममता बॅनर्जी तर कधी अरविंद केजरीवाल चे गोडवे गातात, खांदे शोधतात, तर कधी बिहार मुख्यमंत्र्याला समोर करतात ही शरद पवारांची राजकारणातील विफलता आहे. आणि गंमत म्हणजे शिवसेना पक्षाला त्यांनी पुर्णपणे धुळीत मिळविला होता तो शिवसेना पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा नवजोमाने उभा राहिला. तुमच्या समोर असणाऱ्या पोरसवद्या देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी तुम्हाला धुळ चारली. तुम्ही आणि तुमचे सरकार हात चोळत बसण्यापलिकडे काही करु शकले नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सारखा नेता शताब्दी मध्ये एकदाच जन्माला येत असतो. भारत देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची ताकद फक्त भाजपा आणि शिंदे शिवसेना गटात आहे. तुम्ही कितीही भाजपा शिवसेना पक्षांना संपविण्यासाठी प्रयत्न केला तरी ते तुम्हाला शक्य नाही. अशा नेत्यांच्या तत्वांना असत्यवादी तत्वे जर नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमच्यासमोर असणारे पोरसवदे नेता देखील तुम्हावर मात करतात. ८० लाख लोकसंख्येचा देश इस्त्रायल त्यात ८० लाख देशभक्त तर भारतात कॉंग्रेस पक्षासह अनेक स्वार्थासाठी बजबजलेले देशविरोधी कारवायांत गुंतलेले पक्ष. ह्यात भारत हिंदू राष्ट्र कसे बनणार? हाच् स्वार्थी राजकारण आणि निस्वार्थ राजकारण किंवा जनतेची सेवा करणे. ह्यातील फरक आहे.
हे आम्हाला तुम्हाला कळले तरी दहा वाजून दहा वर स्थिरावलेल्या पक्षश्रेष्ठींना केव्हा कळणार?
मात्र हिंदू मतदारांना पण कळायला हवे की देशाला जर हिंदू राष्ट्र घोषित करायचे असेल. विश्वात विश्वगुरू बनायचे असेल तर एकजूट भाजपा शिंदे शिवसेना ह्या शिवाय पर्याय नाही अन्यथा हिंदू समाजाची फरफट निश्चित आहे.

भाई देवघरे

Leave a Reply