संपादकीय संवाद – पत्राचाळ प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींकडून केली जावी

सध्या महाराष्ट्रात पत्राचाळ प्रकरण बरेच गाजते आहे, या प्रकरणात शिवसेनेतील एक वजनदार नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत गजाआड झालेले आहेत, त्यांच्याविरोधात ईडी कोर्टात आरोप पत्र दाखल झाले आहे. या आरोप पत्रात एक माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्र्याचा सहभाग असल्याचे आरोपपत्रात म्हटले असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे संशयाची सुई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे झुकते आहे.
शरद पवारांचे नाव या पूर्वीही अनेकदा अनेक घोटाळ्यामध्ये गोवले गेलेले आहे, १९९१ ते ९५ या काळात पवारांचा भूखंड घोटाळा बराच गाजला होता, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत या घोटाळ्यावर आधारित विडंबन गीतही काँग्रेस विरोधी प्रचारात वापरली गेली होती, अजूनही अश्या विविध घोटाळ्यामध्ये त्यांचे नाव गोवले गेले आहे, मात्र नेमके पुरावे न मिळाल्याने पवार आतापर्यंत सहीसलामत राहिलेले आहेत. अर्थात यात पवारांची हुशारी आहे कि खरोखरीच ते दोषी नाहीत, याचे उत्तर देणे कठीण आहे.
शरद पवार हे व्यक्तिमत्व १९७८ नंतर कायम संशयाच्या भोवऱ्यात राहत आलेले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस फोडून बौपक्षीय आघाडीचा प्रयोग करत त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले आणि इथूनच शरद पवार कायम वादग्रस्त होत गेले. या दरम्यान त्यांनी दोनदा काँग्रेस पक्ष सोडला एकदा मुख्यमंत्रीपदासाठी सोडला, तर एकदा पंतप्रधानपद मिळावे म्हणून त्यांनी नवा घरठाव केला. मुख्यमंत्रीपद दोनदा मिळाले मात्र पंतप्रधानपदाने कायम त्यांना हुलकावणीच दिली. या काळात ते कायम संशयाच्या भोवऱ्यात राहत आलेले आहेत.
आता पत्राचाळ प्रकरणातही त्यांचे नाव घेतले जात आहे, मिळालेल्या माहितीनुसार हा जवळजवळ ११०० कोटींचा घोटाळा आहे, या घोटाळ्यात शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले गेलेले राज्यसभा सदस्य संजय राऊत हे गजाआड झालेले आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप लागलेले आहेत, आता आटोपपत्र देखल होत असतांना संशयाची सुई शरद पवार यांच्याकडरही वळताना दिसते आहे.
या पार्श्वभूमीवर पत्राचाळ प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे झाले आहे. ईडीने चौकशी करून गुन्हे दाखल केले आणि आग संजय राऊत यांच्या विरुद्ध आरोप पत्रही सखल केले आहे. मात्र पवारांसारख्या व्यक्तीचे नाव घेतले जात असेल तर अधिक खोलात जाणे गरजेचे ठरविते. या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत या प्रकरणाची चौकशीव्हावी अशी पंचानामाची मागणी आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply