आमच्या दोघांचेही विचार भव्यदिव्य, म्हणूनच आमची मनं जुळतात – नितीन गडकरींबाबत राज ठाकरेंचे मत

नागपूर : १९ सप्टेंबर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच दिवशीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटन आणि आगामी महापालिकेच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. असे असले तरी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत म्युझिकल फांऊटन शो ला उपस्थित होते. राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राजकारणापलिकडचे नाते आहे. त्यामुळेच अशा सार्वजनिक कार्यक्रमात ते अनेक वेळा एकत्र आले आहेत. तर आमच्या दोघांचेही विचार हे भव्यदिव्य असतात म्हणूनच आमची मनं जुळतात असे राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितले. राजकारण विरहित असलेल्या लेजर शो चा आनंद दोन्ही नेत्यांनी घेतला.
लेझर शो च्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे दर्शन घडवून दिले. तर आगामी काळात हा म्युझिकल फांऊटन शो अधिक भव्यदिव्य होणार असल्याचे सांगितले.
राज ठाकरे हे राजकारणामधले कलाकार तर आहेतच. शिवाय त्यांना कलेची जाणीव असल्यानेच ते अशा कार्यक्रमाला हजेरी लावतात. नागपूरात दरवर्षी अशा म्युजिकल फांऊटने कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आगामी वर्षात येथील पार्किंगपासून ते बसण्याच्या सोई-सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply