आधार शैशवाचा…- नंदकुमार वडेर

… शैशव सांगते जराजर्जरतेला हात माझा धरलीश का… टाकून देशील या काठीला… मी उभी राहते काठी ऐवजी… निर्धास्त राहशील माझ्या बोला…हा चिमुकला हात देईन तुझ्या आधाराला…हसशवील का मला सांगून त्या काऊ चिऊच्या गोष्टीला…गालावरच्या खळीला खळखळून हसता दाविन तुला… विसरुन जाशील तुझ्या दु:ख तापत्रयाला… हरवून बसशील म्हातारपणाला… गतजन्मातल्या आठवणीचां उलगडशील शेला…जो तुला हसवून रडवून गेला… करशील त्याची उजळणी…मी पुढे लिहीनं बरं त्याची चरित्र कहाणी… होती माझी आजी एक…जीवन जगले किती ती सुरेख…संस्कारधनाचे गाठोडे रिते केले तिने मजपुढे…काठी सारखी उंच हो, कतृत्त्वाने उत्तुंग हो… मायेचा आधार हो .. घराण्याचा शिलाधार हो… संसाराची जननी हो दुरितांची माय हो… दुष्टांंसाठी भवानी हो… कितीएक ते दिले तिने आर्शिवाद मला… ममतेचा हात पाठीवरुनी फिरला… एकीचे ते चालणे दुडदडणे दुसरीचे ते चालणे दुडक्याचे… पाठ आली टेकीला काठी ती टेकायला नातीचा बोल बोबडा आहेना आधाराला… देवळातला देव जणू आला तिला भेटायला…

नंदकुमार वडेर, सांगली.
9920978470
.

Leave a Reply