अमरावतीत दर्गा परिसरात झोपलेल्या दोघांची गळा चिरून हत्या

अमरावती : १५ सप्टेंबर – अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील दडबडशहा दर्गा परिसरात झोपलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी रोडवरील दडबडशहा दर्ग्याच्या आवारात दोन इसम झोपले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास या दोघांचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृतकांमध्ये मुजावर अनवर (वय ५०) राहणार लाल खडी आणि तौसीफ खान (वय २५) राहणार कारंजा या दोघांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी लोणी व बडनेरा पोलीस दाखल झाले आहेत. कुणाचे कारण अद्या स्पष्ट होऊ शकले नसले तरी या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्याला चांगलाच हादरा बसला आहे.

Leave a Reply