नागपूर शहर शिवसेनेने रवी राणांच्या विरोधात मोर्चा काढत दाखल केली तक्रार

नागपूर : १४ सप्टेंबर – अमरावतीचे आमदार रवी राणा यांचे मंगळवारी नागपुर विमानतळावर आगमन झाले असतांना प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाहक खोटे आरोप करतांना आरती सिंग उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असून वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला व वसुलीचे पैसे मातोश्रीवर पुरवतात असा आरोप केला होता.
याच आरोपांचे खंडन करण्यासाठी शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ व नागपूर महानगर संपर्क प्रमुख दृश्यांत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेने रवी राणांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे.
या दरम्यान रवी राणा मुर्दाबाद, पोलिस के सम्मान में शिवसेना मैदान में, उद्भव जी संघर्ष करो, गृहमंत्री होश में आओ अश्या प्रकारचे नारे लावण्यात आले. या मोर्च्यामध्ये शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष शिवसैनिकांनी भाग घेतला, हा मोर्चा चिखली चौक कळमना येथून सुरु होत कळमना पोलीस स्टेशनपर्यंत गेला येथे पोलिस निरीक्षक विनोद पाटिल यांच्याकडे रवी राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत रवी राणा काहीही तथ्य नसतांना व कोणतेही पुरावे नसतांना पोलीस अधिकारी व माजी मुख्यमंत्र्यांविरोधात जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे मृत्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे समाजभवना दुखावत असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. नितीन तिवारी यांनी सांगितले कि चंद्रशेखर बावनकुळेंनी जेव्हापासून पुढील अमरावतीचा खासदार भाजपचा असेल असे म्हटले आहे तेव्हापासून राणा दाम्पत्य हवेत उडायला लागले आहेत. तसे महाराष्ट्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी राणा दाम्पत्य पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत व पोर्सलिसांवर व माजी मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप करत आहेत.
यावेळी शहर प्रमुख दीपक कापसे , बहुजन नेते सुरेश साखरे,मुन्ना तिवारी, नितिन नायक,अंगद हिरोंदे, विशाल कोरके, आशा इंगले, पूजा गुप्ता , नीलिमा शास्त्री, ज्ञानलाता गुप्ता, वैशाली खराबे, विजय शाहू, मुकेश रेवतकर, ललित बावनकर, दीपक पोहनेकर, भूपेंद्र कथाने, प्रीतम कापसे, अब्बास अली, शशिधर तिवारी,सलमान खान, सुरेंद्र अंबिलकर,राजेश वाघमारे, अभिषेक धुर्वे,गौरव शाहू, शैलेंद्र अंबिल्कर, विनोद शाहू, कार्तिक नरनवरे, शुभम कोर्के, संतोष शाहू, आकाश शिर्के ,शिवशंकर मिश्रा, लारेंस ग्रेगोरी,सबरुद्दीन खान यांच्या समवेत शेकडो शिवसैनिक , युवसेना, महिला अघाड़ी, वहातुक सेना, कामगार सेना के यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply