राणा दाम्पत्याकडून आपल्या जीवाला धोका – युवकाचे राणा दाम्पत्यावर आरोप

अमरावती : १२ सप्टेंबर – अमरावतीमध्ये कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा वादात सापडले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने नंतर ज्या तरुणावर पळवून नेल्याचा आरोप केला होता, त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. राणा दाम्पत्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप तरुणाने कला आहे.
कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा केला होता. अखेर खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
आज खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात सोहेल शहा या तरुणाचे वडील यांनी केली तक्रार दाखल केली होती. या तक्रारी वरून पोलिसांनी कलम 500 बदनामी करणे आणि कलम 506 धमकी देणे अशी कलम लावली आहे. मात्र विनाकारण नवनीत राणा यांनी ‘माझ्या मुलावर लव्ह जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेले अदखलपात्र गुन्हे वाढवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्या तरुणांच्या वडिलांनी केली आहे.
तसंच, राणा दाम्पत्याकडून मुलाला आणि आमच्या कुटुंबातील लोकांवर दबाब असून आमच्या जीवाला राणा दाम्पत्याकडून जीवाला धोका आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी कथित लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता असलेल्या तरूणीचा शोध लागला. बेपत्ता झालेली ही तरुणी अखेर चार दिवसांनंतर अमरावतीत पोहोचली. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. मात्र, या तरुणीच्या आरोपांनंतर आता प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे. मी स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. खासदार नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचा गंभीर आरोपही या तरुणीने यावेळी केला.

Leave a Reply