गडचिरोलीत मुसळधार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा जोडरस्ता वाहून गेला

गडचिरोली : १२ सप्टेंबर – सध्या राज्यात पावसाचं थैमान सूरू आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात रात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या पुलाचा जोडरस्ता वाहुन गेल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाचा तेलंगणाशी संपर्क तुटला आहे. रस्त्याला भलंमोठं भगदाड पडलं असून याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग 63 वर चेन्नुर या गावालगत तेलंगणाच्या हद्दीत हा पुल महाराष्ट्राच्या हद्दीपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या दोन दिवसांपासून तेलंगणासह सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे बतकाम्मा नाल्यावरील मोठ्या पुलाचा जोडरस्ता वाहुन गेल्याने दोन राज्यांना जोडणारी या महामार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. उल्लेखनीय म्हणजे सिरोंचा तालुक्यातील नागरीकांना हैदराबाद वारंगल या मोठ्या शहरासह तीन राज्यांना जोडणारा महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग आहे.

Leave a Reply