महाराष्ट्रातील ४ यात्रेकरूंचा उत्तराखंडमध्ये कार अपघातात मृत्यू

देहराडून : १० सप्टेंबर – टिहरी गढवाल जिल्ह्यातील ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर सकाळी एक गाडी खोल दरीत पडल्याने महाराष्ट्रातील मुंबईतच्या चार यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या गटातीलच एक सदस्य जखमी आहे. रुद्रप्रयागचा रहिवासी असलेला कॅब चालकही या अपघातात जखमी झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उत्तराखंडमध्ये मुंबईतील हे पाच भाविक पोहोचले होते. ते एका म्युझिकल बँडचा भाग होते जे भक्ती गीत सादर करणार होते
मुंबईहून यात्रेकरुंना घेऊन बद्रीनाथला जाणारी कार टिहरी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी श्री राम तपस्थलीजवळ ५० मीटर खोल दरीत पडली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
शिवाजी बुधकर (५३, रा. मुंबई, दहिसर), पुरोषत्तम दत्तात्रेय (३७, रा. ठाणे), जितेश प्रकाश लोखंडे (४३, रा. ठाण्यात) आणि धर्मराज (४०, रा. पालघर) अशी मृतांची नावे आहेत. मुंबईचे रहिवासी ५६ वर्षीय रवींद्र चव्हाण आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ येथील रहिवासी असलेले ३७ वर्षीय चालक रवींद्र सिंह अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या गटातील एकमेव वाचलेले रवींद्र चव्हाण हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि बँडचा भाग होते.
मुनी की रेती पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रितेश साह यांनी टाइम्सला सांगितले की, रुद्रप्रयाग येथील चालकासह सहा जणांना घेऊन ही कॅब हरिद्वारहून बद्रीनाथला जात असताना मुनी की रेती येथील ब्रह्मपुरी आश्रमाजवळ दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) चे एक पथक अपघातस्थळी पोहोचले आणि दोन तासांपेक्षा जास्त काळ हे बचाव कार्य सुरु होते. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जखमींना एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एका यात्रेकरुचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ड्रायव्हरसह इतर दोन जणांवर उपचार सुरू आहेत.
“यात्रेकरूंच्या गटाने हरिद्वारहून टॅक्सीकॅब भाड्याने घेतली. प्राथमिक माहितीनुसार, शिवाजी बुधकर हे बँडचे नेते होते. अपघातातील सर्व मृतांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे”, असं निरीक्षक रितेश साह यांनी सांगितले.

Leave a Reply