सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

गोमूत्र – रोगांवर रामबाण

अमेरिका देश म्हणजे “नाम बडे और दर्शन खोटे” स्वतः च्या नावावर प्रसिद्धी कमवायला जमतील तितक्या जगभरात चोऱ्या चपाट्या करायच्या. आणि अमेरिकेने शोध लावला म्हणून माल खपवायचा. जगभरात प्रसिद्धी मिळवायची, दुसऱ्या देशातील शोधांचे “पेटंट” आपल्या देशात पहिले करायचे आणि अमेरिकेचा झेंडा उंच करायचा.
खरे म्हणजे “हळदीचे” फायदे, गुणधर्म भारतातील आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी पासून वापरात आहे. पण अमेरिकेने “हळदीची पावडर” ह्यावर आपले पेटंट घेऊन ठेवले. म्हणजे भारतात ज्या गोष्टी नामशेष होत चालल्या असताना पाश्चात्य देशांकडून त्याची लाट आली. वैज्ञानिक दृष्ट्या आम्हा भारतीयांना प्राचीन भारतातील गोष्टी, नव्या स्वरूपात विपणन (Marketing) करुन प्रस्तुत केल्या की आम्ही त्या गोष्टी पाश्चात्य किंवा अमेरिकन म्हणून हसत हसत स्विकार करतो ही शोकांतिका आहे. भारतातील पुर्व इतिहास, प्राचीन भारताचा प्रगत इतिहास माहिती न करता आम्ही पाश्चात्य शोधांवर विश्वास ठेवतो आणि भारताला कमी लेखतो, हे ह्या देशाचे वैषम्य आहे. ह्यामध्ये चुकी देशातील जनतेची आहे असे मुळीसुद्धा वाटत नाही कारण बालपणापासून आम्हाला भारताबद्दल कमी शिकविले गेले आहे आणि इतरांबद्दलचा उदो उदो करण्यात आमची धन्यता मानुन पाश्चात्यांचे जोखड गळ्यात बांधण्याची शालेय शिकवण होती. हळूहळू आमच्या डीएनए मध्ये ती आली आणि आम्ही पाश्चात्य देशांकडून आमच्याच पुर्व कालीन शोधांचे बोध घ्यायला शिकलो. अमेरिकेत Turmeric Latte ची लाट आली आणि घरात आईने “दुध हळद पी” आणि निरोगी रहा असे आईचे न ऐकणारी पोरं ऐटीमध्ये ४०० रुपयात कपभर दुध हळद प्यायला लागली. आणि Turmeric Latte प्या म्हणून लोकांना उपदेश द्यायला लागलीत.
बरे, प्राचीन भारत आयुर्वेदच् नव्हे तर “जस्त” हा धातु निर्माण करण्यात जगातील एकमेव देश होता. कारण “जस्त” निर्माण करण्याची किमया फार जटिल होती आणि भारतातून जगभरात व्यापारी जहाजे आमचे भारतीय मसाले, जस्तासारखे धातू अशा अनेक वस्तू घेऊन व्यापार करीत असे. ह्या गोष्टी आम्हाला दुर्दैवाने शिकविल्या नाही गेल्या.
जस्त बनविण्याची प्रक्रिया मग एका चीन च्या माणसाने चोरली त्याच्याकडून ती इंग्रज विलियम्स चॅम्पियन कडे गेली आणि चार हजार वर्षे आमच्या अधिपत्याखाली असणारी जस्ताची किमया इ.स. १५४३ इंग्लंड मध्ये जस्ताची डिस्टीलरी उभी राहिली. आणि ती इंग्रजांच्या शोधातील एक अद्भुत शोध म्हणून गणली आहे. अद्भुत शोध एवढ्यासाठी म्हणतोय, जस्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत द्रवरुप जस्त फक्त ९९७ ते १००० डिग्री सेल्सिअस मध्ये मिळते आणि त्यानंतर ते वायुरुपात परावर्तित होते. त्या फक्त तीन डिग्री मध्ये द्रवरुप जस्ताला थंड करणे, ही खरी जादू होती. ही किमया फक्त भारतीयांना ज्ञात होती. त्यानंतर भारताचे प्रभुत्व संपले. ही सर्व इंग्रज मंडळी प्राचीन भारताचे शोध आणि पैसा हडपून वर्चस्व गाजविणारी मंडळी. तसेच अमेरिका देखील “नाम बडे और दर्शन खोटे” वाली मंडळी.
“हळदीचे” पेटंट (US Patent & Trademark Office (PTO)) अमेरिकेने घेतले आणि श्री मनोहर जोशी मात्र अमेरिकेच्या नावे असणारे पेटंट रद्द करण्याच्या कामाला लागले. India’s council of scientific and industrial Research (CSIR) ने हळदीच्या पेटंटला आव्हान दिले. अमेरिकेतील एका पेटंट विशेषज्ञाला १५००० अमेरिकन डॉलर एवढे शुल्क देऊन हा लढा लढविण्यात आला आणि शेवटी १३ ऑगस्ट १९९५ रोजी भारताने हा पेटंटचा लढा जिंकला आणि अमेरिकेचे हळदीवरील पेटंट खारिज झाले. अमेरिकन आजदेखील नाव घेतात आणि म्हणतात की भारताने हा लढा आर्थिक स्त्रोतांसाठी नव्हे तर भारतातील आयुर्वेदिक अस्मितेसाठी लढला.
आता गंमत म्हणजे “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” अमेरिकेत ज्यांना A2 आणि A1 दुधातील फरक कळायला १०० वर्षे लागलीत त्या अमेरिकनांना गायीच्या मुताचे एवढे काय वावडे? नाही पण आज देखील गोमुत्राचे चार पेटंट अमेरिकेच्या नावे आहेत. तसे बघितले तर “सुश्रुत संहिता आणि अष्टांग संग्रह” ह्या मध्ये “गोमूत्र – कामधेनू अर्क” असा उल्लेख आहे. तर आयुर्वेदात जैव वर्धक आणि जैव परिणामकारक म्हणून गोमुत्राचा उल्लेख आढळतो.
भाव प्रकाश नुसार “गोमूत्र” जगातील सर्व प्राणिमात्रांच्या तुलनेत सर्वोत्तम मुत्र आहे. गोमुत्राचा उल्लेख “संजीवनी किंवा अमृत” असा करतात. शेतजमीन आणि मानवी शरीर ह्यासाठी गोमूत्र अतिशय उत्तमरीत्या कार्य करते.
मुत्र असले तरी मानवी शरीराला ते उपयुक्त आहे. विघातक श्रेणीत कदापि येत नाही. गोमूत्र म्हणजे ९५% पाणी, २.५% युरिया आणि २.५% खनिजे, क्षार, हार्मोन्स, एन्झाइम्स आहेत.
आयुर्वेदात शरीरासाठी “सुवर्ण” अतिशय चांगले मानले गेले आहे. सुवर्ण सुतशेखर, स्वर्ण भस्म, सारखे कितीतरी आयुर्वेदिक औषधात “सुवर्णाची” औषधी किमया सांगितली आहे. सुवर्ण असणारी ही औषधे अतिशय महागडी आहेत. घेणाऱ्या सर्वांनाच अशी औषधे नियमित विकत घेणे आवाक्याबाहेरचे असते. अशावेळी गोमूत्र हा सगळ्यात स्वस्त आणि नियमित उपचार! ऑ! चमकलेत! गोमुत्रात सुवर्ण? होय! क्षारांमध्ये स्वर्ण क्षार काही प्रमाणात आढळतात. “गीर” प्रजाती च्या गायींमध्ये तर हे प्रमाण एका लिटरला १०-३० मिलीग्रॅम एवढे आढळते. ह्या विषयावर सध्या गुजरात, जुनागढ मध्ये संशोधन सुरू आहे. त्याचप्रमाणे प्राचीन भारतात बिल्वपत्र व ताम्र ह्यांच्या संयोगाने सुवर्ण तयार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत ज्ञात होती ती आता लुप्त झाली आहे. किंवा खरोखर संशोधन केल्यास आपण शोधू शकतो.
अर्थात औषध म्हटले की ते वैद्यकीय सल्ल्याने घेणे केव्हाही श्रेयस्कर.

गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् ।
लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।।
शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु ।
मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।।

अर्थात – गोमूत्र हे कडू, उष्ण, खारट, तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे.

विकीपिडियाने गोमुत्राचे फायदे वेबसाईट वर सार्वजनिक केले आहेत ते असे –
दातांच्या रोगात दात स्वच्छ करून गोमूत्र थोडावेळ तोंडात धरून ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या काबोलीक ऑसिडमुळे होते.
लहान मुलांची हाडे कमजोर, सकाळी अनोशापोटी, नियमित ५० मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
गोमूत्रामधील लॅकटोज मुले व वृद्ध याब प्रोटिन्स देते.
गोमूत्र आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
गोमूत्र वृद्धावस्थेमध्ये मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
गोमूत्र महिलांच्या हिस्टीरिया जनिक मानसिक रोगांना रोखते.
महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बारा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही. हे गोमुत्राचे वैशिष्ठ आहे.
नियमित गोमूत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
गोमूत्र त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
गोमुत्र थायरॉड मध्ये देखील फायदा देते.
गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
हार्ट मधील ब्लॉकेज गोमुत्राने हळू-हळू ओपन होतात.
बेकरीचे पदार्थ, वडापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थानी गॅसेस, आंबट ढेकर, ऍसिडीटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात, यावर गोमूत्र रामबाण उपाय आहे.
अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
चमचाभर गोमूत्रामध्ये २ थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
गोमूत्रात थोडे गाईचे तूप व कापूर मिसळून कापड ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
गुडघे, कोपर, पोटऱ्या, मासपेशींमध्ये दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
शौचाला साफ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र हे लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा ५०-५० मिली घ्यावे.
डायबिटीसमध्ये गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवते.

आमच्या ओळखीतील एक व्यक्ती अगदी नियमित पणे गोमूत्र प्यायचे त्यांना मी कधी ही कोणताही रोग झालेला बघितला नाही. सतत अगदी हासतमुख आणि निरोगी वार्धक्य.
आजदेखील बरीच मंठळी नियमित पणे गोमूत्र सेवन करीत असतात. त्यातील वृद्ध मंडळी आज देखील निरोगी अवस्थेत वार्धक्य अनुभवताहेत आणि खुश हाल जीवन जगताहेत.
बरे, गोमूत्र फक्त मनुष्याच्या कामी येते का? नाही! शेतजमीन, गायीच्या शेणाच्या खतात जर गोमुत्र मिसळून टाकले तर जमिनीचा कस अधिक वाढतो, परिणामी पिकांचे उत्पादन वाढते.
जंतुनाशक पिकांवर मारल्याने पिकांमध्ये विषारी फवारे मारतात परिणामी व्यवस्थित रित्या साफ केले गेले नाही तर असे अन्न पोटात जाण्याची शक्यता खूपच असते पण गोमुत्राची फवारणी केली असता, पिकांमध्ये किड पडत नाही.
रात्री ग्लासांच्या पंगतीत बसून ३० – ६० – ९० मिली. असा तिसाचा पाढा वाचण्यापेक्षा जर रोज सकाळी फक्त ३० मिली. गोमूत्र गरम पाण्यात पिले गेले तर भविष्यात निरोगी आयुष्याची हमखास शाश्वती असेल.
आता फक्त अमेरिकेने घेतलेल्या पेटंटवर भारत कसा कुरघोडी करतो! हे बघायचे!

भाई देवघरे

Leave a Reply