लखनौमध्ये हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू , १० जखमी

लखनौ : ५ सप्टेंबर – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळी आग लागली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने, खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशमन दलाच्या बचावकार्यात अडथळा येत होता. यामुळेच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बचावकार्यासाठी खिडक्या फोडण्यास सुरुवात केली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी आहेत.
सकाळी ६ वाजता ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केलं. धूर झाल्याने हॉटेलमधील अनेकांचा जीव गुदरमत होता. आतमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्याचं मोठं आव्हान अग्निशन दलासमोर होतं. सुटका करण्यात आलेल्या काहीजणांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply