बुलढाण्यात माजी सरपंच अडकला हनी ट्रॅपमध्ये

बुलडाणा : ५ सप्टेंबर – बुलडाणा शहरातील क्राईम रेट हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. शहरात एक हनी ट्रॅपची घटना घडलीये. येथे एका माजी सरपंचला कॉल करुन त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या माजी सरपंचाचे व्हिडिओ काढून त्याला ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आली होती.
या माजी सरपंचाला एका महिलेने फोन करुन निर्जन स्थळी बोलावलं. मला तुमच्यासोबत संबंध प्रस्थिपित करायचे आहे, असं सांगितलं. त्यानंतर ती महिला निर्वस्त्र होऊन अश्लील कृत्य करणार, तेवढ्यात तिथे दबा धरुन बसलेले पाचजण आले आणि त्यांनी माजी सरपंचला मारहाण केली. तसेच, तुझे व्हिडिओ काढले आहेत, ते व्हिडिओ व्हायरल करु, अशी धमकीही दिली. त्यासाठी माजी सरपंचाकडे एक लाख रुपयाची मागणी केली.
मात्र, माजी सरपंचाजवळ तेवढे पैसे नसल्याने त्याच्याजवळील साडेपाच हजार रुपये त्यालोकांनी काढून घेतले आणि पळून गेले. त्यानंतर माजी सरपंचाने थेट पोलीस ठाणे गाठवे आणि या घटनेची माहिती बुलडाणा पोलिसांत दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना महिलेसह अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुलडाण्यात अशा घटनांमध्ये सध्या वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना बळी पडू नका असं आवाहन बुलडाणा पोलिसांनी केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या माजी सरपंचाला एका महिलेने फोन केला. यावेळी ती महिला म्हणाली, मी तुमच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करु इच्छिते. त्यानंतर माजी सरपंचांनी तात्काळ सांगितलेल्या शहरातील निर्जन अशा डी एड कॉलेज परिसर गाठला. त्यानंतर महिलेने एका टीन शेडमध्ये त्यांना बोलावलं. महिला निर्वस्त्र झाली, पण पुढे काही होणार त्यापूर्वीच तिथे लपून बसलेल्या पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच, त्यांच्याजवळ असलेले साडे पाच हजार रुपयेही काढून घेतले.
बुलडाणा पोलिसांनी अवघ्या काही तासातच ५ आरोपींसह २३ वर्षीय महिलेला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply