झोपाळ्यावरील महालक्ष्मी

तख्तपोस, टेबल, चौरंग, पाट किंवा अगदी जमिनीवर बसवलेल्या महालक्ष्मी सर्वांनीच पाहिल्या आहेत. पण, महालक्ष्मींसाठी झोपाळा (पाळणा/बंगई) वापरला जात असल्याचे किती जणांना माहीत असेल ? चला तर मग, झोपाळ्यावर आरूढ झालेल्या महालक्ष्मींच्या दर्शनाला…
नागपूरच्या प्रसिद्ध लाखे प्रकाशनाचे संचालक चंद्रकांत लाखे यांच्या घरच्या महालक्ष्मी चक्क झोपाळ्यावर उभ्या असतात ! तीन दिवसपर्यंत त्यांना जपणे किती कठीण जात असेल, हे लाखे कुटुंबीयच जाणोत !! गेली पाऊणशे वर्षे, म्हणजे चार पिढ्यांपासून ही आगळीवेगळी परंपरा ते श्रद्धेने जोपासत आले आहेत !!!
आतापर्यंत मुकुंदराज पथावरील पिढीजात घरात हे व्हायचे. गेल्या दोन वर्षांपासून मात्र अयोध्यानगरातील नवीन घरी झोपाळ्यावरील महालक्ष्मींचे आगमन होत आहे

Leave a Reply