भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन

माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संदेशाद्वारे भंतेजींच्या दिर्घायूष्याची केली कामना

नागपूर : २ सप्टेंबर – बौद्ध धम्मगुरु व बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीलढ्याचे प्रणेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे ८८ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट प्रदेश काँग्रेस व महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसतर्फे अभिष्ठचिंतन करण्यात आले.
राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रकृती बरी नसल्याने डॉ. राऊत यांचा संदेश त्यांचे कार्यालयीन सचिव लालाजी जैस्वाल यांनी भंतेजीपर्यंत पहुच केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. राऊत यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे भंतेजीच्या दिर्घायूष्याची कामना केली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव आसिफ शेख, सतीश पाली, गौतम अंबादे, जयकुमार रामटेके, निलेश खोब्रागडे, राकेश इखार, चेतन तरारे, सलीम मस्ताना, कुणाल निमगडे, निशाद इंदुरकर, सुशांत गणवीर, उमेश डाखोरे, पंकज सहारे यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा शुभेच्छा संदेश

डॉ. नितीन राऊत म्हणाले, जेव्हापासून भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब समजले तेव्हापासून बुध्द धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीलढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार, असा निर्धार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे (दीक्षाभूमी) अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला आहे. नागपुरात निवासाला असले तरी भदंत ससाई यांनी देशभरात भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठी कार्य केले. त्यांचे कार्य आज पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही संदेशात डॉ. राऊत म्हणालेत.

Leave a Reply