आ. राजू पारवे आणि कार्यकर्त्यांचे उमरेड रोडवरील टोल नाक्यावर आंदोलन

नागपूर : १ सप्टेंबर – आमदार पारवेसरह नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आमदार राजू पारवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह नागपूर-उमरेड रस्त्यावरील टोल नाक्यावर आंदोलन करत बळजबरीने टोल वसुली बंद पाडली. त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता की चांपा गावाजवळ टोल नाका (बूथ )चालवणारी खाजगी कंपनी परप्रांतीय तरुणांना रोजगार देत असून स्थानिक तरुणांना नोकरीची संधी देत नाहीये. यावेळी टोल नाका चालवणाऱ्या खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार राजू पारवे यांची शाब्दिक बाचाबाची ही झाली.

Leave a Reply