…वार-पलटवार – विनोद देशमुख

‘गद्दारी’चे इजा-बिजा-तिजा

‘खऱ्या शिवसेने’चा निर्णय सुप्रीम कोर्टात लागेल तेव्हा लागेल. पण तोवर ‘गद्दारी’वरून आरोप-प्रत्यारोप होतच राहणार, हे नक्की. आता माजी शिवसैनिक नारायण राणेंनी यात उडी घेतली आणि शिंदे गटालाच खरी शिवसेना ठरविले. शिंदेसेनेची तीन वैशिष्ट्ये सांगता येतील- तळागाळातून आलेला खमक्या कट्टर शिवसैनिक नेता, दोनतृतीयांश आमदार-खासदारांचा पाठिंबा आणि संयमित, पण हुशार प्रवक्ता.
हो. या गटाचे मुख्य प्रवक्ते आणि आता मंत्री असलेले दीपक केसरकर यांची कामगिरी दमदारच म्हणावी लागेल. विशेषत: ठाकरे गटाचे सतत शिवीगाळ करणारे महान प्रवक्ते संजय राऊत किंवा अरविंद सावंत यांच्या तुलनेत केसरकरांची प्रतिमा खूपच चांगली राहिली आणि शिंदे गटाची बाजू शांतपणे, आक्रस्ताळेपणा न करता, भक्कमपणे मांडण्यात ते यशस्वी झाले.
वारंवार होणारा ‘गद्दारी’चा आरोप, हा शब्दही न उच्चारता, ठाकरे गटावरच उलटवताना ते किती मुद्देसूद राहिले पाहा. यासाठी त्यांनी तीन प्रमुख घटनांचा दाखला दिला. एक- भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळालेले असताना विरोधी आणि पराभूत काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार बनविणे हा लोकशाहीचा, मतदारांचा, हिंदुत्ववादी विचारांचा धडधडीत अवमान. दोन- मुख्यमंत्र्याने स्वत:च्या मुलालाच मंत्री करणे हा राज्याच्या थोर लोकशाही परंपरेला काळिमा फासण्याचा प्रकार. आणि, तीन- छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून निष्ठापत्र लिहून घेण्याचा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्राच्या दैवताचा अन् अस्मितेचा अपमान. हे सारे +++शिवाय दुसरे काय आहे, असा केसरकरांचा सवाल आहे.
गद्दार… गद्दार… म्हणत गेले महिनाभर महाराष्ट्रात फिरणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी या तीन मुद्यांचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊन ‘गद्दारी’बद्दलचा संभ्रम दूर करणे गरजेचे आहे बघा

विनोद देशमुख

Leave a Reply