तुळजापुरात शौचास गेलेल्या ६ वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचाराचा प्रयत्न

तुळजापूर : ३१ ऑगस्ट – विकृतीची परीसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शौचालयासाठी गेलेल्या ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.
6 वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या घराजवळच्या शेतात शौचासाठी गेली. त्यावेळी आरोपीने संधी साधून तिला उचलून गेलं. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूच्या महिला काय घडलं ते पाहण्यासाठी आल्या.
आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने महिलां तिला वाचवण्यासाठी आल्या. या महिलांनी आरोपीला बेदम चोप दिला. या महिलांनी नराधमाच्या तावडीतून सुखरुप सुटका केली. आरोपीला ग्रामस्थ आणि महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
तर जखमी अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामस्थ आणि महिलांनी नराधमाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील करत आहेत.

Leave a Reply