तातडीचे दावे सूचिबद्ध करण्यासाठी लवकरच नवी यंत्रणा – सरन्यायाधीश उदय लळित

नवी दिल्ली : ३० ऑगस्ट – तातडीचे दावे सूचिबद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय लवकरच नवी यंत्रणा कार्यान्वित करणार आहे, असे सरन्यायाधीश उदय लळित यांनी सोमवारी सांगितले. आम्हाला एक वा दोन दिवस द्या, नवे नियम जारी करण्यात येतील. येत्या गुरुवारपासून त्यांची अंमलबजावणी सुरू होईल, असेही न्यायमूर्ती लळित यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय पीठाने स्पष्ट केले.
तातडीच्या दाव्यांच्या सुनावणीसाठी त्यांना सूचिबद्ध करण्याबाबतच्या मुद्याकडे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. त्यावर, नोंदणी करण्यात आलेले प्रत्येक प्रकरण कधी ना कधी सूचिबद्ध होतेच आणि त्याचा समावेश अद्ययावत सूचितही होतो. अशी प्रकरणे १० दिवसांत सूचिबद्ध होतात किंवा अद्ययावत यादीत त्यांचा समावेश होतो, असे न्यायमूर्ती लळित यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply