85 वर्षीय प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

चंद्रपूर : २९ ऑगस्ट – येथील प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथील जलतरण तलावात आज त्यांनी या जलयोगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यामुळे कृष्णाजी नागपुरे हे जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती झाले आहेत. नागपुरे यांचं वय 85 वर्ष असून गेल्या 70 वर्षांपासून ते जलयोग प्रसाराचं काम करताहेत. आज त्यांनी 37 प्रकारच्या योगासनांचं आणि योगमुद्रांचं 37 मिनिटात सादरीकरण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये या अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
कृष्णाची नागपुरे हे तरुणांनाही लाजविणारे आहेत. त्यांचं वय सध्या 85 वर्षे आहे. तरीही ते पाण्यात पोहतात. नुसते पोहतच नाहीत. तर पाण्यात ते सहज बराच वेळ काढू शकतात. या उतरत्या वयात त्यांनी 37 मिनिटे पाण्यात राहून 37 प्रकारची योगासनं केलीत. याची नोंदही घेण्यात आली. इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. अशाप्रकारची योगासन करणारे ते सर्वात जास्त वयाचे व्यक्ती ठरलेत.
21 जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. चंद्रपुरातील कृष्णाजी नागपुरे यांनी जलतरण तलावात योगसाधना केली. हे सर्वांच आकर्षण ठरलं होतं. जलतरण तलावातल्या पाण्यावर श्वास आणि लयबद्दता सांभाळून त्यांनी 20 प्रकारची योगासन केली होती. पाण्यात हालचाल करत असताना दोन्ही हात पाठीमागे घेऊन उंदीर चाल, बदकचाल, खडीचाल असा काही जलतरणाचे प्रकार आहे. त्यानंतर जागेवर फिरणं, पद्मासन, शवासन, नमस्कार करणं, हे सारं ते पाण्यात सहज करतात. पाण्यात पद्मासन करताना आधार राहत नाही. वयाच्या 85 व्या वर्षी पाण्यात योगासनं करून त्यांनी आदर्श निर्माण केला.

Leave a Reply