भारताच्या गृहमंत्र्याच्या मुलाने राष्ट्रध्वज का हाती घेतला नाही?- भारत-पाक सामन्यानंतर जय शाह समाजमाध्यमांवर ट्रोल

मुंबई : २९ ऑगस्ट – आशिया कपचा पहिला सामना खेळणाऱ्या भारताने काल पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या विजयामुळे देशवासियांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात हरवल्याचा एक वेगळा आनंद असतो. अशा विजयानंतर खरंतर वादविवाद होऊ नयेत, पण राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. काल दुबई मधल्या स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होता. त्यावेळी हा सामना पहायला बीसीसीआय सचिव जय शाह उपस्थित होते. ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे सुपूत्र आहेत. चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्याचा जय शाह यांनी सुद्धा आनंद घेतला. भारताच्या विजयावर त्यांनी सुद्धा सेलिब्रेशन केलं. पण या दरम्यान त्यांच्या एका कृतीवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय.
भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना जय शाह प्रेक्षक स्टँड मध्ये उभे होते. त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी एकाने त्यांच्याहाती तिरंगा झेंडा देऊ केला. पण जय शाहंनी नकार दिला. हेच व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालय. त्यावरुन विरोधी पक्षाचे नेते, नेटीझन्स त्यांना सुनावतायत. जय शाह बीसीसीआयचे सचिव आहेतच, पण आशियाई क्रिकेट संघटनेचेही ते अध्यक्ष आहेत.
एखाद्या बिगर भाजपा नेत्याने तिरंगा ध्वज हाती घ्यायला नकार दिला असता, तर भाजपाच्या संपूर्ण आयटी विंगने त्याला देशविरोधी ठरवलं असतं. गोदी मीडियाने दिवसभर वादविवाद कार्यक्रम केले असते. नशीबाने तो शेहनशाहचा मुलगा आहे” असं टीआरएस नेत्याने म्हटलं आहे. काहींनी जय शाह यांच्यावर आरएसएसच्या पूर्वजांचा प्रभाव असल्याचं म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र टि्वटर हँडलवरुनही या विषयी टि्वट करण्यात आलं आहे. ‘भारताच्या गृहमंत्र्याच्या मुलाने राष्ट्रध्वज का हाती घेतला नाही?’ असा सवाल केला आहे.

Leave a Reply