भरत गोगावले यांनी जे भाष्य केले ते योग्य नाही – दीपक केसरकरांची सारवासारव

मुंबई : २९ ऑगस्ट : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पक्ष चिन्हाबाबत विधान केल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, ‘भरत गोगावले यांनी जे भाष्य केले ते योग्य नाही, यापुढे असे विधान पक्षांकडून येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे’ असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी सारवासारव केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल. या प्रकरणाचा फैसला चार ते पाच वर्ष लांबेल, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलं होतं. तसंच, शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल, असा दावाही गोगावले यांनी केला होता. त्यांच्या विधानानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
‘भरत गोगावले यांनी जाहीर सभेमध्ये काही चुकीचे बोलले असल्याचे बाहेर आले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना असे भाष्य करणे योग्य नाही. भरत गोगावले यांनी जे भाष्य योग्य नाही यापुढे असे विधान पक्षांकडून येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, अनावधानाने त्याच्याकडुन जे निघालेले आहे. असे कुठले ही विधान पक्षाच्या वतीने केलेले नाही, ह्याबद्दल पदाधिकारी किंवा आमदार काहीही ह्याच्याबद्दल बोलणार नाहीत’,अशी ग्वाही केसरकरांनी दिली.
भरत गोगावले यांनी सीमा भागाचा उल्लेख करत असताना हे भाष्य केले आहे. हा विषय इथेच संपवावा असे माझे मत आहे. आमदार वर नियंत्रण नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असंही केसरकर म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा करण्याची परंपरा घालून दिली आहे. अनेक वर्ष शिवतीर्थावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहेत. शिंदे यांनी दसरा घेण्याचा विचार केला नाही किंवा घेण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, असंही केसरकरांनी स्पष्ट केलं.
रविवारी संध्याकाळी कर्जतमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा झाला. या मेळाव्या भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या चिन्हाबाबत भाष्य केलं. ‘सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल. या प्रकरणाचा फैसला चार ते पाच वर्ष लांबेल. शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल, असा दावाच गोगावले यांनी केला होता. कोर्टातील सुनावणीवर ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरू असल्यानं शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यामुळे गोगावलेंच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.

Leave a Reply